चंद्रपूर काँग्रेस म्हणते त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा

चंद्रपूर कांग्रेसचे पोलिसांना निवेदन

News34 chandrapur

चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी भारतीय जनता पक्षाचे चित्तपूर, (कर्नाटक) विधानसभेचे उमेदवार मनीकांत राठोड यांनी दिली. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राठोड याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे. यासंबंधीची तक्रार चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. Malikarjun kharge congress

कर्नाटक राज्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. चित्तपूर विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनीकांत राठोड यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राठोड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. कर्नाटक राज्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे खरगे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मनिकांत राठोडवर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचा विधानसभेचा उमेदवार निवडणुकीच्या काळात अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. परंतु, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. हा प्रकार निंदणीय असल्याची टीका जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रवीण पडवेकर, गोपाल अमृतकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, भालचंद्र दानव, पप्पू सिद्दीकी, तवंगर खान, नौशाद शेख यांचा समावेश होता.