संतोषसिंह रावत यांच्यावर हल्ला करणा-या आरोपींना तात्काळ अटक करा – आमदार किशोर जोरगेवार

संतोष रावत यांना संरक्षण द्या

News34 chandrapur

चंद्रपूर – काही अज्ञातांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार केला या हल्यात ते जखमी झाले आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मुल येथील निवासस्थानी जाऊन संतोषसिंह रावत यांची भेट घेत प्रकृती बाबत माहिती घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दुरध्वनी वरुन जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याशी संपर्क साधत घटनेचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच आरोपींचा शोध घेत त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या आहे. Mla kishor jorgewar

 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे मुल येथील शाखेतील बैठक आटपून बाहेर निघताच चारचाकीने आलेल्या काही युवकांनी त्यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला. यात संतोषसिंह रावत यांच्या हाताला व खांद्याला जखम झाली आहे. या घटनेनंतर मुल तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत घटनेबाबत माहिती घेतली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेत आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या आहे. घडलेला हा प्रकार चिंताजनक आहे. एखाद्या प्रतिष्ठित नागरिकावर गोळीबार झाल्याचा प्रकार यापूर्वी जिल्ह्यात कधीही घडला नाही. त्यामुळे याचे गांभीर्य अधिक आहे. Cdcc bank chandrapur president santosh rawat

चंद्रपूर जिल्ह्या हा शांतीप्रिय जिल्हा आहे. अश्या येथे अशा प्रकारे बंदुकधारी युवक फिरत असेल तर ही चिंतेची बाब आहे. असे जिवघेने हत्यार यांच्याकडे येतात कुठुन याचीही आता सखोल चौकशी पोलिस विभागाने करावी. अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहे. संतोषसिंह रावत यांच्याकडे स्वरक्षणासाठी स्वत:ची पिस्तुल होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी परवाणा रिन्युवल केला नाही. त्यांचा हा पिस्तुल परवाना तात्काळ रिन्युवल करा अश्या सूचनाही जिल्हाधिकारी विनय गौडा यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. तसेच संतोषसिंह रावत यांना पोलीस सुरक्षा देण्याच्या सूचनाही आ. जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षक परदेसी यांना केल्या आहे. Gun license