भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या स्मृती दिनानिमित्त तालुका काँग्रेस तर्फे अभिवादन

कांग्रेसने केले अभिवादन

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृती दिना निमित्य मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, व संचालक घनश्याम येनुरकर, ग्रामीण नेते राजू पाटील मारकवार, ओबीसी काँग्रेस सेलचे प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, महिला शहर सचिव शामला बेलसरे, शहर उपाध्यक्ष कैलास चलाख यांचेहस्ते प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, महिला सदस्या राधिका बुक्कावार, फरजाना शेख, सुरेश फुलझेले, काँग्रेस सदश गंगाधर घुगरे, मल्लेष यारेवार, व इतर तालुका शहर कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. व उपस्थितांचे आभार मानले.