अल्ट्राटेकच्या लोडिंग भरतीला भ्रष्टाचाराचे ग्रहण

भ्रष्टाचाराचे ग्रहण

News34 chandrapur

चंद्रपूर – मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील नावाजलेली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत लोडर भरती सुरू आहेत. भरती घेण्याकरिता एका प्रसिद्ध पत्रातून जाहीरनामा काढला त्या नन्तर दत्तक गावातील बेरोजगार युवक तसेच कंपनीतील कामगारांनी लोडर मध्ये लागणार या मोठ्या आशेने हजारो पेक्षा अधिक कामगाराने फॉर्म भरून दिला.

मात्र त्यातील काही मोजक्याच लोकांना परीक्षा व इंटरव्ह्यू करण्या करीता बोलविण्यात आले असून पहिल्याच भरती पासून कंपनीचे अनेक कारनामे पुढे आले यात कंत्राटदारच्या जवळचे,युनियन पदाधिकारी यांच्या जवळचे,ग्रा.प.आजी माजी पदाधिकारी यांच्या घरचे,अशा लोकांचे चयन करण्यात आल्याने अनेक कामगारांच्या भोवया उंचावल्या या ठिकाणी दोन दोन युनियन असताना विरोध करताना कुणीही दिसत नसल्याने यात सर्वांनीच हात धुतले असल्याचा संशय कामगारांच्या मनात सलत असून पुढारी व युनियन पदाधिकारी यांच्या प्रति आता आक्रोश निर्माण झाला आहे यात पैस्याची देवाण घेवाण झाल्याचे सब्बळ पुरावे एका तरुणाने युनिट हेड व कामगार संघटनेच्या मुख्य पदाधिकारी यांच्या कडे केल्याने फक्त एका दलालाचा राजीनामा घेतला असल्याची चर्चा लोडर कामगार वर्गात आहेत त्यामागील कारणही तसेच आहेत कारण मागील दोन महिन्यांपासून तो कामगार हजर नाही आणि कंपनी व्यवस्थापन याबाबत कुणालाही माहिती देण्यास तयार नाही याबाबत युनियनच्या पदाधिकारी यांची चुप्पीही अनेक शंका निर्माण करून जाते.

त्या दलालाचा राजीनामा घेऊन कंपनीने अधिकाऱ्यांना योग्य रित्या वाचविले असल्याची चर्चा कामगार वर्गात आहे कंपनी कडून प्रसिद्ध केलेल्या पत्रात १० वी पास असतांना काही जण यात पदाधिकारी यांच्या घरचे ८ वी नापास लागल्याने त्यांनी कागदपत्रात घालमेल केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत एका कामगाराने तक्रार केल्याने एकाला कंपनीने १० वी नापास असल्याने घरी बसविल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, मात्र स्थानिक राजकीय पदाधिकारी यांचे पाठबळ असल्याने कंपनी तक्रारींवर योग्य ती चौकशी करून कारवाई करीत नसल्याच्या भावना अनेकांनी बोलून दाखविल्या असल्याने ही लोडर भरती भ्रष्टाचारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे एकूणच पैसा बोलता है. मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी पध्दतीने काम करीत असलेल्या कामगाराकडे पैसे नसल्याने आम्ही पाच पाच लाख कुठून द्यायांचे भाऊ असे बोलून दाखवीत आहेत.

भ्रष्टाचार मुक्त भारत या संदेशाला कंपनीने दिले आवाहन

एवढी मोठी कंपनी असल्याने सर्व आपले हित साधण्यात व्यस्त असल्याने ना खाऊंगा ना खाणे दूंगा या संदेशाला आव्हाहन देत असून यामुळे खरच भ्रष्टाचार मुक्त भारत झाला का असा प्रश्न नागरिकात निर्माण झाला असून कामगार वर्गात मोठा आक्रोश दिसत असून मोठ्या आंदोलनाची शक्यता बळावली आहेत.