राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चंद्रपूर जिल्ह्यात

खासदार धानोरकर यांच्या घरी सांत्वनपर भेट

News34 chandrapur

चंद्रपूर – देशात पंतप्रधान मोदी यांची लाट होती, मात्र त्या लाटेच्या विरुद्ध गती प्राप्त करीत राज्यात कांग्रेसची लाज राखणारे बाळू धानोरकर यांनी देशाच्या गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पराभव करीत देशपातळीवर निवडणूक जिंकत बाळू धानोरकर खासदार झाले.

मात्र 30 मे 2023 ला त्यांच्या निधनाची माहिती अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.
धानोरकर यांच्या शरीरात संक्रमण पसरले मात्र त्यासाठी करण्यात आलेल्या उपचाराला त्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता, या कारणामुळे संक्रमनाचे मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्यांचा मृत्यू झाला.

खासदार धानोरकर आपल्यात नाही हे कळल्यावर सुद्धा त्यावर विश्वास होत नव्हता, धानोरकर यांचं पार्थिव त्यांच्या गृह शहर वरोरा येथे दाखल झाले, लाखोंच्या संख्येत नागरिक त्यांच्या घरी दाखल झाले होते, डोळ्यात अश्रुंचे ओझे वाहत नागरिक धानोरकर यांच्या पार्थिवाकडे बघत राहिले.
16 मे ला धानोरकर यांच्या घराच्या गृह प्रवेश कार्यक्रमात हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती, मात्र ती भेट शेवटची ठरेल हे कुणालाही ठाऊक नव्हतं.

19 मे पासून त्यांच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या आणि त्यांना तात्काळ नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, प्रकृती खालावत असताना त्यांना नागपूर वरून air ambulance ने दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र संक्रमण वाढलं आणि उपचाराला प्रतिसाद बंद झाल्याने धानोरकर यांची प्राणज्योत मालवली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली.

31 मे ला खासदार धानोरकर यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरोरा येथे दाखल होणार आहे.