कोरपना तालुका बनला अवैध धंद्याचं कॅपिटल

अवैध धंदे बंद होणार काय?

News34 chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात सध्या पोलिसांच्या अनेक कारवाई पाहायला मिळत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या समोरं त्या कारवाई करण्याचा हा आलेख रिपोर्ट ठेवला जात आहे? आणि मोठे काम केल्याचा गुण गायले जात आहे.

अवैध दारू व्यावसायिक ते सट्टा व्यावसायिक यांच्या कडून दरमहा लाखो रुपयांची वसुली केल्या जात आहे?या मध्ये गेल्या दोन महिन्यात जवळपास अवैध दारू, सट्टा यांच्या जवळपास २५ पेक्षा अधिक केसेस केल्या गेल्या आहे मात्र या केसेस नाममात्र आणि बनावट आहे अशी चर्चा कोरपना तालुक्यात चांगलीच रंगली आहे.

दरमहा अवैध व्यवसाय कडून लाखो रुपये एन्ट्री घेऊन त्यांना केसेस (बनावटी) मागायच्या हा गोरखधंधा गेल्या दोन महिन्यांपासून कोरपना तालुक्यात सुरू केला आहे. कोरपना तालुका हा अतिदुर्गम परिसर म्हणून ओळखला जातो.

तेलंगणा सीमा असल्यामुळे आणखीनच या ठिकाणी मोठे साखळे वाहतुकीचे विणल्या गेले आहे, दरमहा लाखो रुपये ट्रान्सपोर्ट करण्याऱ्या वाहतुकीत एन्ट्री च्या नावाखाली वसुली करण्यात येत आहे.

पोलिस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या वागणुकीने पोलिस कर्मचारी सुध्दा त्रस्त झाले आहे?. मात्र डिपार्टमेंट मध्ये काम करायचे आहे त्यामुळे” झाकली मूठ सव्वा लाखाची”अस विदारक चित्र या ठिकाणी पहावयास मिळत आहे. पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी या अधिकाऱ्यावर अधिक विश्वास दाखवला मात्र बनावटी केसेस करून टॉप टीप दाखवणाऱ्या या अधिकाऱ्याला आता कुठली वाट दाखवेल हे बघणे बाकी आहे. गेल्या दोन महिन्यात वारंवार केसेस करून दाखवत आहे तर ते धंदे बंद व्हायला हवे. मात्र त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार चालणाऱ्या सर्व बाबीचा खुलासा लवकरच केल्या जाईल?

सध्या कोरपना तालुक्यात बोगस बियाणे, अवैध सुगंधित तंबाखूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र हा धंदा बंद का होत नाही? याबाबत लवकरचं बातमीद्वारे खुलासा करण्यात येणार.