चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याचे संकेत

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले असून यामध्ये जिल्हानिहाय व जिल्हा अंतर्गत बदल्या होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी व त्यावर नियंत्रण मिळविण्यास अपयशी ठरणारे काही पोलीस अधिकारी यांच्यावर बदलीची गदा कोसळणार असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षक यांची जिल्हा अंतर्गत उचलबांगडी तर काहींची जिल्हा बाहेर बदली होणार आहे, यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

येत्या 2 दिवसात याबाबत महाराष्ट्र गृह विभागाची यादी प्रसिद्ध होणार आहे.