News34 chandrapur
चंद्रपूर – राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेतील महिला समृद्धी योजनेचे वैशिष्ट्य काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत. या योजनेचा लाभ कुणाला व कसा मिळणार याबाबत आम्ही आपल्याला माहिती देत आहोत.
योजनेचे स्वरूप काय?
राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ नवी दिल्ली च्या राष्ट्रीय महामंडळाची ही योजना आहे.
बचत गटातील महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता सदर योजना राबवली जाते, सदर योजना इतर मागासवर्गात (OBC) मोडणाऱ्या महिलांसाठी आहे.
ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटामार्फत कर्ज पुरवठा करण्यात येतो. प्रकल्प मर्यादा 5 लाख रुप्यापर्यंत बचत व गटातील 20 सदस्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयापर्यंतचे कर्ज मिळते.
योजनेच्या अटी काय?
अर्जदार हा इतर मागासवर्गातील असावा, महाराष्ट्र राज्याच्या सर्वसाधारण निवासी असणे आवश्यक आहे, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे, संपूर्ण कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी 98 हजार तर शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत असावी.
या योजनेत राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग 95 टक्के, राज्य महामंडळाचा सहभाग 5 टक्के तर लाभार्थीचा सहभाग निरंक असणार. व्याज दर 4 ते 5 टक्के, कर्ज परतफेडीचा कालावधी हा 3 वर्षाचा असेल.
यासाठी आपल्याला जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात सम्पर्क साधून त्याबाबत अर्ज प्राप्त करीत कागदपत्रांची पूर्तता करावी, यासाठी आपल्याला जवळच्या महामंडळाच्या कार्यालयात सम्पर्क साधावा.