भूषण फुसेंच्या दणक्यानंतर प्रशासन लागले कामाला

फुसेंच्या आंदोलनानंतर प्रशासनाची धावाधाव

News34 chandrapur

चंद्रपूर – वंचितचे राजुरा विधानसभेचे उमेदवार, माजी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या आंदोलनाचा राजुरा तालुका प्रशासनाने धसका घेतला असून कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्रांवर धाडी टाकून बोगस बी बियाणे विरोधात तपासणी मोहीम सुरू केली आहे.

8 जूनला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजुरा तहसील कार्यालयासमोर कापसाची होळी करून कापसाला भाव द्या, बी बियाण्यांचा काळा बाजार थांबवा, औषध, खते व फवारणीच्या किमती कमी करण्यासह इतर मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे तहसीलदार हे निवेदन स्वीकारण्यास बाहेर येत नसल्याने आंदोलन काही काळ चिघळले होते.त्यांनतर पोलिसांचा फोजफाटा दाखल झाला.मात्र वंचितचे नेते भूषण फुसे व आंदोलनकारी तिथून हटण्यास तयार नसल्याने अखेर तहसिलदार यांनी बाहेर येत निवेदन स्वीकारले व आंदोलक शेतकरी व वंचितच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर आता राजुरा प्रशासनाने वंचितच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली असून राजुरा तालुक्यात बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिक व दुकानांवर धाडी टाकुन दुकानांची तपासणी करण्यात येत आहे.