चंद्रपुरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची रायगड येथे बदली

News34 chandrapur

चंद्रपूर – राज्याच्या गृह विभागाने 16 जून ला तब्बल 449 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले, यामध्ये 336 बदल्या या विनंतीनुसार करण्यात आल्या आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे, नागपूर शहरातील राजकमल वाघमारे यांची चंद्रपुरात बदली करण्यात आली आहे.

बंदोबस्तात पोलिसांनी ढोसली दारू, चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी केले निलंबित

वाशीम येथील विजय राठोड यांची चंद्रपुरात, नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांची नागपुर शहर, चंद्रपुरातील बाळासाहेब खाडे यांची बदली रायगड येथे करण्यात आली आहे.
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ पदस्थापनेवर रुजू होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.