चंद्रपुरातील पोलिसांची वर्दीवर दारुगिरी

2 पोलीस कर्मचारी निलंबित

News34 chandrapur

चंद्रपूर/ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी वर्दीवर बिअर शॉपिमध्ये जात दारू पिल्याने दोघांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची तडकाफडकी कारवाई केल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

2 जून रोजी ब्रह्मपुरी येथे जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करण्यात आले होते, त्यादरम्यान ब्रह्मपुरी उपविभागातील पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता, आंदोलन सुरू असताना 3 कर्मचारी बिअर शॉपी च्या दुकानात जात बिअर ढोसत बसले होते, मात्र त्यामधील 1 कर्मचारी उभा होता.
याची माहिती ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांना मिळाली त्यांनी तात्काळ त्या बिअर शॉपी कडे मोर्चा वळवीला असता तळोधी येथील पोलीस कर्मचारी उमेश मस्के व नरेश निमगडे दोघेजण वर्दीवर दारू पीत होते, यांच्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांना पुढील माहिती दिली.
चंद्रपुरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
बिअर बार मध्ये 2 कर्मचारी दारू पित होते तर एक कर्मचारी उभा होता, याबाबत चौकशी झाल्यावर पोलीस अधीक्षकांनी उमेश मस्के व नरेश नीमगडे या दोघांना शुक्रवारी 16 जून ला निलंबित केले.
त्या तिसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिले आहे.