चंद्रपुरातील रामसेतू पुलावर हत्येचा थरार

चंद्रपूर बनतंय गुन्हेगारीचे हब

News34 chandrapur

चंद्रपूर – गुन्हेगारी वृत्तीचे हब बनत चाललेल्या चंद्रपूर शहरात पुन्हा क्षुल्लक वादात एकाची हत्या करण्यात आली आहे, सध्या जिल्ह्यात हत्येच्या गुन्ह्यात वाढ होत असून 2 दिवसात 2 हत्येच्या घटना पुढे आल्या आहे.

बाबूपेठ येथील निवासी संदीप पिंपळकर यांच्या लग्नाचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम चंद्रपुरातील दाताला रोडवर असलेल्या एका लॉन मध्ये 15 जूनला आयोजित करण्यात आला होता, स्वागत समारंभ दरम्यान डीजे सुरू झाला आणि असंख्य युवकांनी गाण्यावर ठेका धरला, मात्र त्यावेळी बाबूपेठ येथे राहणारे काही युवक व तिरवंजा येथे राहणारे काही युवकांमध्ये डीजे च्या तालावर नाचण्यावरून वाद झाला, उपस्थित नागरिकांनी तो वाद सोडविला.

लग्न समारंभ आटोपत तिरवंजा तालुका भद्रावती येथील नागरिक 48 वर्षीय किशोर पिंपळकर त्यांचा मुलगा ओम पिंपळकर व पुतण्या असे 3 ते 4 जण घरी जाण्यासाठी निघाले.
मात्र वाटेत रामसेतू पुलाजवळ पिंपळकर यांना लग्न समारंभात वाद झालेल्या युवकांनी अडवीत मारहाण सुरू केली.
वाद वाढला असता किशोर पिंपळकर यांनी वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता आरोपी युवकांनी किशोर यांच्या डोक्यावर रॉड ने वार केला अचानक झालेल्या त्या वाराने किशोर पिंपळकर खाली कोसळले, आरोपी युवक इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी उपस्थित 2 ते 3 युवकांना सुद्धा रॉड ने मारहाण केली.
हा सर्व प्रकार रामसेतू पुलावर सुरू होता मात्र कुणीही पिंपळकर यांना वाचविण्याचा प्रयत्न केला नाही, मारहाण केल्यावर युवकांनी तिथून पळ काढला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले, किशोर पिंपळकर यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, प्रकृती गंभीर असताना त्यांना नागपूर येथे रेफर केले.
चंद्रपूर जिल्ह्यात जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी गौडा यांचा आदेश
उपचार घेतल्यावर पिंपळकर घरी परतत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला, पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत 5 आरोपीना अटक केली.
आरोपीमध्ये आदित्य उर्फ दादू गुडे, रमेश उर्फ रोहित कोमटी, आर्यन बाबू चव्हाण, राहुल उर्फ बोच्छा दीपक व राज उत्तम टेकाम यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात अजून काही आरोपींची अटक होण्याची शक्यता वर्तविली आहे, पोलिसांनी लॉन, डीजे व आयोजकांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.