जिल्हा सामान्य रुग्णालयातून बाळ चोरीला चंद्रपूर पोलिसांनी 3 तासात गुन्हा केला उघड

चंद्रपूर पोलीस ठरले सिंघम

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णांसाठी सुरक्षित नाही ही बाब आज सकाळी घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले, सकाळी 8 वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डिलिव्हरी वार्डातून 4 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाली, मात्र पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या 3 तासात आरोपीचा छडा लावण्यात आला.

चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात, रुग्णालयात खाजगी सुरक्षा रक्षक सुद्धा आहे, तरीसुद्धा आज सकाळी 8 वाजता डिलिव्हरी वार्डातून 4 दिवसांच्या बाळाची चोरी झाली, चोरी झाल्यानंतर मातेने रुग्णालय परिसरात हंबरडा फोडला.

पोलिसांना पाचारण करण्यात आले, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि मंगेश भोंगळे आपल्या चमुसह रुग्णालयात दाखल झाले, त्यांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, आरोपी एका कॅमेऱ्यात कैद झाले, व तात्काळ आपली चमू आरोपीच्या मागावर पाठवली व अवघ्या 3 तासात हिंगणघाट येथून आरोपीला बाळासाहित ताब्यात घेण्यात आले.

बाळ लवकर मिळावे व अश्या घटना पुन्हा घडू नये यासाठी भाजयुमो चे शहर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला होता.

चोरी कशी झाली…

आरोपी ही महिला असून ती रुग्णालय परिसरात 3 ते 4 दिवसापासून वावरत होती, फिर्यादी महिलेसोबत तिने ओळख निर्माण करीत तिचा विश्वास संपादन केला व त्यांनतर आज 20 जून ला सकाळी बाळा ला सोबत घेत रुग्णालयातून ती महिला पसार झाली, मात्र चंद्रपूर पोलिसांच्या तत्परतेने आरोपीला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश मिळाले.

याआधी सुद्धा एका महिलेचे नवजात बाळ रुग्णालयातून चोरी झाले होते मात्र तेव्हा बाळ मिळाले नाही.

रुग्णालय परिसरात खाजगी सुरक्षा ही केवळ नावापुरती आहे.