24 जून रोजी चंद्रपुरात भव्य जगन्नाथ पुरी रथयात्रा

भव्य रथयात्रा, भाविकांनी लाभ घ्यावा

News34 chandrapur

चंद्रपूर : जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर चंद्रपूर येथे प्रभू जगन्नाथ, प्रभू बलदेव आणि सुभद्रादेवी यांची मोठी रथयात्रा चंद्रपूर महानगरात २४ जूनरोजी काढण्यात येणार असून, चंद्रपूरकरांनी या रथयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) चंद्रपूरचे अजूर्ननाथ दास, अभयचैतन्य दास यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केेले.

 

जगन्नाथ पुरी येथे दरवर्षी रथयात्रा काढली जाते. जगन्नाथपुरीची रथयात्रा जगात प्रसिद्ध आहे. याच पार्श्चभूमीवर चंद्रपुरात इस्कॉनच्या माध्यमातून दरवर्षी रथयात्रा काढण्यात यावर्षी नागरिकांच्या भरगच्च उपस्थितीती ही रथयात्रा काढण्यात येणार आहे. बंगाली कॅम्प येथील कालामाता मंदिरपासून दुपारी २ वाजता रथयात्रेचा प्रारंभ होणार आहे.

डॉक्टरच्या एका चुकीने अख्ख कुटुंब झालं उध्वस्त

 

बंगाली कॅम्प, महसूल भवन, जटपुरा गेट, गिरणार चौक ते परत जटपुरा गेट व्हाया महसूल भवन येथे रथयात्रेची रात्री ८ वाजता सांगता होईल. यानंतर रथयात्रेत सहभागी भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणारे. दोरीच्या सहाय्याने ही रथ ओढण्यात येणार आहे. या रथयात्रेत चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अर्जूननाथ दास व इस्कॉनच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.