माता दूर्गा मंदिर मुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – अत्यंत धावपळीच्या जीवनात योग ही काळाची गरज आहे. योग म्हणजे मनाचा व आत्म्याचा व्यायाम योगामुळे मनःशांती, संयम, स्फूर्ती, उत्साह आणि थकवा नाहीसा होतो.

रोजच्या योगामुळे आपल्यात असलेले अनेक आजार, रोग नकळत नाहीसे होतात. या उदात्त हेतूने स्थानिक माँ दुर्गा मंदिर येथे मंदिर समितीचे अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांच्या जयंती दिनापासुन चंद्रपूर योग नृत्य परिवाराचे संस्थापक गोपालजी मुंदडा यांचे मार्गदर्शनात मूल येथे योग नृत्य परीवार निर्मण केला. तेव्हापासून आजातागायत दुर्गा मंदीर येथे योग नृत्य करण्यासाठी महिला व पुरुषांची उपस्थिती लक्षणीय राहिली आहे.

चंद्रपुरातील मूल तालुक्यात योग दिनाचे आयोजन
मूल तालुक्यात योग दिन साजरा

दिनांक २१ जून २०२३ रोजी सकाळी ५.१५ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिंन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुल येथील पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांनी योग नृत्यात सहभागी होऊन नृत्य केल्यानंतर योग नृत्याचे फायदे आपल्याला कसे मिळतात यावर अतिशय मार्मिक शब्दात योग नृत्य करणाऱ्या शेकडो महिला व पुरुषांना मार्गदर्शन केले. तसेच मंदिराचे पुजारी पंडित मुकेश महाराज यांनी मनुष्य स्वभाव, शरीर, आत्मा, शांती यांचा दैवीक शक्तीशी कसा संबंध आहे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नियमितच्या योग नृत्य सरावाला येणाऱ्या रत्नमाला ठाकरे, रंजना चौधरी व बंडू गुरनुले यांनी स्वतःच्या जीवनात व अतःमनात झालेल्या बदलाविषयी अनुभव कथन केले.

आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांचे मंदिर समितीच्या वतीने संचालक गुरु गुरनुले व नियमित योगनृत्य करणाऱ्या सौ. रत्नमाला ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी मानले. उपस्थित सर्वांना लिना जंबुलवार यांचे वतीने आल्पोहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.