हा काळाबाजार यांचे परवाने रद्द करा – आमदार प्रतिभा धानोरकर

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

News34 chandrapur

चंद्रपूर : आगामी खरीप हंगामात बी- बियाणे, खते यामध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे चोर बीटी बियाने विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून परवाने रद्द करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,कृषिमंत्री व अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.
alt="mla pratibha dhanorkar"
आमदार प्रतिभा धानोरकर
                  शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट दरवर्षी येत असते. मागील वर्षी देखील चोर बिटी व खते मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली होती. निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्यामुळे मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचे पीक देखील उगवले नव्हते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक देखील झाली होती. याकडे अनेकदा संबंधित अधिकारी देखील अक्षम्य दुर्लक्ष करतात हे फार दुर्दैवी आहे.
            शेतकऱ्यांची सातत्याने होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्ह्यात पथक निर्माण करून चोर बीटी बियाणे व निकृष्ट दर्जाची खते विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करावे, अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.