News34 chandrapur रमेश निषाद
बल्लारपूर – 27 नोव्हेंबर 2022 मध्ये बल्लारपूर रेल्वे जंक्शन वरील पादचारी पूल कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू तर 13 नागरिक जखमी झाले होते, आता त्याठिकाणी बाजूला नवा पादचारी पूल 26 जून पासून प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात आला.

मागील 5 महिन्यापासून दुरुस्ती करिता हा पादचारी पुलाचे काम सुरू होते, प्रवाश्यांना ये-जा करण्यासाठी 5 स्थानकांवर जाण्याकरिता हाच एकमेव पूल होता.
प्रवाश्यांना होणारा त्रास बघता राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य अजय दुबे यांनी सदर पूल लवकर सुरू व्हावा यासाठी पाठपुरावा केला.
26 जून पासून हा पूल प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, EDPM नीरज शर्मा, मध्य रेल्वे मुंबई महाप्रबंधक नरेश लालवानी, मध्य रेल्वे नागपूर चे DRM तुषारकांत पांडेय, वरिष्ठ DCM आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ DEN पद्मनाथ झा, बल्लारपूर चे AEN सुबोध कुमार यांचे आभार मानले आहे.
पादचारी पूल सुरु करण्यात आल्यावर यावेळी स्टेशन अधीक्षक नंदनवार, RPH निरीक्षक सुनील कुमार पाठक, वाणिज्य निरीक्षक मिश्रा, भाजपचे मिथिलेश पांडे, सुजित निर्मल, संदीप पोडे, श्रीकांत उपाध्याय, शेख करीम आदींची उपस्थिती होती.