चंद्रपूरच्या गोल बाजारात टमाटर किती रुपये किलो?

गृहिणींचे बिघडले बजट

News34 chandrapur

चंद्रपूर – मागील महिन्यात टमाटर 10 रुपये ते 20 रुपये किलो दराने विकल्या जात होता मात्र महिना उलटला आणि टमाटर ने इतिहास रचत थेट शंभरी गाठली.

महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांवर पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब फुटला असून गृहिणींचे बजट सध्या पूर्णपणे बिघडून गेले आहे.

Tomato price hike
चंद्रपुरातील गोल बाजारात टमाटर ने गाठली शंभरी

महिन्याभरात टमाटर दरात तब्बल 1900 टक्के वाढ झाली आहे, किंमती वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांना टमाटर ची चव चाखणे महागात पडणार आहे.

राज्यात सध्या टमाटर 100 ते 120 रु किलोने विकल्या जात आहे, चंद्रपुरातील गोल बाजारात टमाटर चे दर 100 रुपये किलो झाले आहे.

 

सतत सुरू असलेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये टमाटर ची आवक कमी झाली आहे, सध्या महिन्याभरात टमाटर चे दर पुन्हा वाढणार असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ऑगस्ट महिन्यांनंतर किमती कमी होणार अशीही शक्यता वर्तविल्या गेली आहे, टमाटर च्या मागे आता हिरवा भाजी पाला सुद्धा महाग झाला आहे, सध्या मिरची आणखी तिखट झाली असून मिरची सुद्धा काही दिवसात शंभरी गाठणार असा अंदाज आहे.

 

सण उत्सव काळात हिरवा भाजीपाला महाग असणार आहे, सतत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत असल्याने नागरिकांसमोर जुळवाजुळव करण्यात अनेक समस्या निर्माण होत आहे.