चंद्रपुरातील सुगंधित तंबाखू तस्करांनी थाटले किराणा दुकान

सुगंधित तंबाखू तस्करीचा नवा मार्ग

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू ची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र या प्रतिबंधीत तंबाखू तस्करीवर अन्न व औषध विभागाने आतापर्यंत मोठी कारवाई केली नाही.

Tobacco mafia chandrapur
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू

चंद्रपुरात अनेक मोठे नाव या तंबाखू तस्करी मध्ये सक्रिय आहे, काही तस्करांना राजकीय पाठबळ असल्याने ते नेहमी त्या बळाचा वापर करीत कोरे सुटतात.

मात्र आता सुगंधित तंबाखू तस्करी करणाऱ्यांनी चक्क किराणा दुकान थाटले कारण त्या दुकानाच्या आड ही तस्करी करणे सुरक्षित व कुणाला संशय न येणारी मानली जाते.

चंद्रपुरात पडोली, बिनबा गेट, रयतवारी, बाबूपेठ, भानपेठ हे या सुगंधित तंबाखू तस्करीचे मुख्य केंद्र आहे, विशेष म्हणजे तस्करी करणारे सर्व माफियांनी किराणा दुकान थाटले आहे.

दर महिना किंवा आठवड्यात किराणा माल पोहचविण्यासाठी चारचाकी वाहन सर्व जिल्ह्यात फिरते त्या वाहनात सुगंधित तंबाखूचा माल ही पोहचविला जात आहे.

मात्र यावर दखलपात्र कारवाई करण्यास अन्न व औषध प्रशासन विभाग मागे पडत आहे, सध्या चंद्रपूर पोलीस या अवैध धंद्यावर कारवाई करताना दिसत आहे, भावी पिढीला कॅन्सर सारख्या जीवघेण्या चक्रव्यूहात ढकलण्याचे काम हे तस्कर करीत आहे, 20 रुपयांच्या खर्र्यासाठी 20 लाखांचा खर्च होताना दिसत आहे.

कन्फेक्शनरी च्या माध्यमातून लाखोंचा माल दुकानात पोहचविल्या जातो…

 

कन्फेक्शनरी म्हणजे सध्या चंद्रपुरात अनेकांनी होलसेल दुकान म्हणजे त्याठिकाणी सिगारेट, चिप्स, चायपत्ती, अश्या अनेक वस्तूची सप्लाय करण्यासाठी तंबाखू तस्करांनी हा नवा मार्ग सुगंधित तंबाखूसाठी स्वीकारला आहे.

बाबूपेठ, रयतवारी, पडोली, MIDC, बागला चौक याठिकाणी या तस्करांनी आपले मोठे गोदाम निर्माण केले असून त्यामध्ये लाखोंचा सुगंधित तंबाखू दडलेला आहे, मध्यरात्री किंवा पहाटे हा माल हलविल्या जात आहे.

 

नुकतेच राजुरा पोलिसांनी राजुरा पंचायत समिती चौकातील खालिद एजाज हुल्ला यांच्या महाराष्ट्र किराणा दुकानात व गोदामात तपासणी केली. दरम्यान त्याचे महाराष्ट्र किराणा दुकानात व गोदामात प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू आढळून आला. या दुकानात विविध चार प्रकारचा सुगंधित तंबाखू व इतर सुगंधित तंबाखू विक्रीस ठेवला होता. या मालाची एकूण किंमत 6 लाख 250 रुपये असून पोलिसांनी हा प्रतिबंधित माल पंचासमक्ष ताब्यात घेतला.

 

येथील पुंडलिक रागीट यांचे लक्ष्मी किराणा दुकानात सुगंधित तंबाखू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने झडती घेतली असता विविध कंपनीचा एकूण 34 हजार 490 रुपयांचा सुगंधित तंबाखू ताब्यात घेण्यात आला. तसेच अशोक ठक्कर यांचे जय अंबे किराणा आणि गोदाम मध्ये विविध कंपनीचे प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू किंमत 1 लाख 1 हजार 486 रुपयांचा माल तसेच कर्नल चौक येथील मनीष पिंजवाणी यांचे मनीष किराणा दुकानातून एक हजार रूपयांचा प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू मिळाला.

पुढील कार्यवाही अन्न औषध प्रशासनाकडे

पोलिसांनी एकूण 7 लाख 37 हजार 216 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता अन्न व औषध प्रशासन विभाग यांना कळविण्यात आले आहे. ही कारवाई डीवायएसपी विशाल नागरगोजे, एपीआय जोशी, पीएसआय हाके, पीएसआय गेडाम आणि राजुरा पोलीस कर्मचारी यांनी केली.