चंद्रपुर शहरातील या भागात अस्वलीने केला सायकल स्वारावर हल्ला

चंद्रपूर शहरातील लालपेठ भागातील घटना

News34 chandrapur

चंद्रपूर – चारही बाजूने वन क्षेत्राने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनेक दिवसांपासून वन्यप्राणी शहरात कुठेही आढळून येतात, 6 जुलै ला शहरातील लालपेठ क्रमांक 2 मध्ये अस्वल दिसल्याने नागरिकांनी अस्वलीला पळवून लावले, अस्वल त्या भागातून पळाली मात्र नांदगाव रोड जंगल छावणी परिसरातून जाणाऱ्या 40 वर्षीय इसमावर त्या अस्वलीने हल्ला केला.

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार धानोरकर सक्रिय

नांदगाव रोड परिसरातून तो इसम सायकलने जात होता, अचानक झुडूप मार्गातून अस्वलीने त्याच्यावर उडी घेत खाली पाडले, तितक्यात त्या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी अस्वलीला पळवून लावले.
या हल्ल्यात तो इसम जखमी झाला, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून त्या अस्वलीला जेरबंद करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. अस्वल सध्या ओपनकास्ट कॉलरी कडे गेला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पत्रकाराला धमकी

 

लालपेठ परिसरात याआधी सुद्धा वन्य प्राण्यांच्या हल्ले झाले आहे, त्याच कारण की लालपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे आहे, वेकोलीचे क्षेत्र असल्याने त्यांचं या बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे, या परिसरात झुडपांचे प्रमाण अधिक असल्याने भविष्यात या घटना पुन्हा वाढणार अशी चर्चा आहे, जर भविष्यात कुणाच्या जीवाची हानी झाली तर त्या घटनेला वेकोली सहित वनविभाग जबाबदार राहणार असा इशारा नागरिकांनी दिला.