News34
चंद्रपूर – चंद्रपूर येथील तुकुम प्रभाग क्रमांक एक अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रवादी व तुलसी नगर येथे संपूर्ण परिसरात पावसाळ्याच्या पाण्यामुळे संपूर्ण रस्ते चिखलमय झाल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे.
संपूर्ण रस्ते पावसाच्या पाण्यामुळे चिखलमय व खोल खड्डे जागोजागी पडलेले असून याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सदर समस्येमुळे या वार्डातील नागरिक प्रचंड त्रास सहन करीत आहे. सदर रस्त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांना जाण्या येण्यासाठी कोणताही मार्ग नसल्यामुळे नागरिकांची व विद्यार्थ्यांची सदर रस्त्या न जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .असे चित्र या वार्डात आहे.
परंतु याकडे महानगरपालिका प्रशासनाचे व या वार्डातील माजी नगरसेवकाचे संपूर्णता दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रवादी नगर व तुलसी नगर येथील रोडची समस्या नाल्यांची समस्या प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे.
पाहिजे त्या प्रमाणात इथे रोड व नाल्या चे बांधकाम करण्यात आले नाही दिवसेंदिवस नागरिकांच्या समस्या व लोकसंख्या इथे वाढत असल्याकारणाने पाहिजे त्या प्रमाणात विकास कामाला गती दिसून येत नाही. तरी कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सदर समस्या कडे लक्ष वेधून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी येथील सुज्ञ नागरिक करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसात 6 जणांचा मृत्यू
सध्या चंद्रपुरात अनेक विकासाची कामे सुरू आहे काही अपूर्ण अवस्थेत आहे, कोट्यवधी रुपयांचा निधी चंद्रपूरच्या विकासासाठी येत आहे मात्र आजही शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून जो विकास बिनकामाचा आहे, त्याला करून काय फायदा जर नागरिकांना आजही विकासाची प्रतीक्षा करावी लागत आहे.