पालकमंत्री असताना वडेट्टीवार यांनी सावत्र वागणूक दिली पण आता – आमदार सुभाष धोटे

आमदार धोटे यांनी केला गौप्यस्फोट

News34

चंद्रपूर – पालकमंत्री असताना विजय वडेट्टीवार यांनी आम्हाला निधी वाटपात सावत्र वागणूक दिली होती असा गौप्यस्फोट चंद्रपूर जिल्हा कांग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कांग्रेस जिल्हा अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच रविवारी सुभाष धोटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यावर चंद्रपुरातील 15 तालुक्यात मी दौरा करीत कांग्रेस तालुकाध्यक्ष यांच्या काय समस्या व पक्ष बांधणी यावर चर्चा करीत संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करणार अशी माहिती दिली.

जर पक्षात कुणी वातावरण दूषित केलं तर त्याबाबत गंभीर दखल घेत पक्षाच्या नियमानुसार कारवाई सुद्धा करणार अशी माहिती धोटे यांनी दिली आहे.

चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्त्यांना BRS पक्षाची ओढ

सध्या पक्षात जे काही वाद सुरू आहे त्याला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करू, सप्टेंबर नंतर कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं शिबीर आयोजित करू व त्यामध्ये राष्ट्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करणार, चंद्रपूर, बल्लारपूर व चिमूर क्षेत्रात कांग्रेस पक्षाचे आमदार नाही त्याठिकाणी पक्ष मजबूत करीत आगामी निवडणुकीत योग्य उमेदवार देण्याचा प्रयत्न करू.

आमदार वडेट्टीवार यांच्या क्षेत्रातील रस्ते खड्ड्यात

सध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे नसून तर फक्त बल्लारपूर विधानसभेचे पालकमंत्री असल्यासारखे वागत आहे, विकासात्मक कामे असो की घरकुल सारखे महत्वाचे प्रकल्प ते बल्लारपूर विधानसभेसाठी मंजूर होत आहे, बाकी विधानसभेत ज्याप्रमाणे विकास व्हायला हवा तसा विकास ते करीत नाही आहे.

आमदाराचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

महाविकास आघाडी सरकार मध्ये आमच्या पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळी ते सुद्धा निधी वाटपात सावत्र वागणूक देत होते, मात्र त्यानंतर आम्ही त्यांना सदर बाब निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी कांग्रेस खासदार व आमदार यांना योग्य निधी दिला होता मात्र सध्याचे पालकमंत्री मुनगंटीवार इतर विधानसभेचा विचार करीत नाही.

चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाचा अभूतपूर्व पक्ष प्रवेश सोहळा

आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक दावेदार पुढे येतील, चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव मोघेज विनायक बांगडे, मी सुभाष धोटे किंवा प्रतिभा धानोरकर सुद्धा आपली दावेदारी करू शकते, पक्ष ज्याला उमेदवारी देणार त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही अहोरात्र झटणार, मात्र कांग्रेस पक्षातील पदाधिकारी यांचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात येते तर चंद्रपूर लोकसभा सीटवर पहिला अधिकार प्रतिभा धानोरकर यांचा असणार आहे.

पत्रकार परिषदेत आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, महिला कांग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, महिला शहर अध्यक्ष चंदा वैरागडे, दिनेश चोखारे आदींची उपस्थिती होती.