चंद्रपुरात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

उद्धव ठाकरे गटाचे चंद्रपुरात आंदोलन

News34

चंद्रपूर – मागील 2 दिवसापासून भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांचा अश्लील आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नागरिकांना देशाची संस्कृती सांगणाऱ्या भाजप पक्षाचा स्वतः किरीट सोमय्याने उघडा चेहरा दाखविला आहे, आजपर्यंत सोमय्या यांनी अनेकांचे घोटाळे उघडकीस आणले मात्र आता स्वतः किरीट सोमय्या देशासमोर नागडे पडल्याने त्यांच्या विरोधात अनेकांनी निषेध आंदोलन सुरू केले आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्याने सांगितला महत्वाचा उपाय

 

आज आपल्या संवेदनशील आणि संस्कारी महाराष्ट्राचं नाव खराब करणाऱ्या व समाजामध्ये अश्लीलता पसारवणाऱ्या मानसिक रुग्ण किरीट सोमय्या ( कीड सोमय्या ) यांच्या विरोधात आज चंद्रपूर शिवसेनेच्या वतीने जोडे मारून व शाही तोंडावर फेकून आंदोलन करण्यात आले. वाघाने अडवली पर्यटकांची वाट

शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले, यावेळी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख प्रमोद पाटील, उपजिल्हा प्रमुख शालिक फाले, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, युवती सेना सहसचिव रोहिणीताई पाटील , युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे, युवासेना समन्वयक विनय धोबे, युवासेना चिटणीस सुमित अग्रवाल,धोबे ,महिला आघाडी शहर संघिटका वर्षाताई कोठेकर, माजी जिल्हासंघटिका कुसुम उदार, राहुल वीरूटकर, राहुल भोयर, राकेश घटे, समीर कुरेशी, विकास वीरूटकर , हेमराज बावणे, शिवा वझरकर, वैभव काळे, सिकंदर खान, गणेश ठाकूर, रिझवान पठाण, अंकित जयस्वाल, शहबाज शेख आदि कार्यकर्ता उपस्थित होते. चंद्रपूर मनपाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन