विधानसभा अधिवेशनाच्या सत्रादरम्यान आमदार वडेट्टीवार झाले आक्रमक

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आमदार वडेट्टीवार यांनी वेधले लक्ष

News34 maharashtra assembly

चंद्रपूर जिल्ह्यातील खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत ब्राह्मणगाव येथील शेतकरी शेताशेजारी बैल चालत असताना अचानक वाघाने हल्ला करून ठार केले काल घडलेल्या या घटनेत शेतकरी ऋषी देवतळे वय (६०) यांचा नाहक बळी गेला. तसेच चिमूर वनपरिक्षेत्रातील डोमा, तळोदी वनक्षेत्रातील बोडधा बीट व उश्राळा येथे वनालगच्या शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात आठवड्यात भरातच चौघांचा बळी गेल्याची घटना घडली आहे.

अधिवेशनात गाजला शिक्षकांच्या वेतनाचा मुद्दा

सध्या शेतीचे दिवस असल्याने शिवारात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. वन्यजीव व मानव संघर्ष पेटला असताना वाघाच्या दहशतीत शेतकरी प्रचंड भयभीत झाला असतानाही वन विभाग मात्र केवळ आर्थिक मदतीच्या तराजूत नागरिकांच्या जीवाची किंमत ठरवीत असून आपल्या अपयशावर पांघरून घालण्याचे कार्य चालवीत आहे.

शेतकऱ्यांच्या या गंभीर मुद्द्यावर राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, शेतकरी पुत्र तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधून हवालदिल शेतकऱ्यांची हिरीरीने बाजू मांडत सभागृह दणाणून सोडले. यावर अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रशासनाला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जनतेची माफी मागायला हवी

उत्तर दक्षिण ब्रह्मपुरी वनवृत्तातील तळोधी, चिमूर, नागभिड व सिंदेवाही वनपरिक्षेत्राला लागून असलेल्या शिवारात खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू झाली आहेत त्यामुळे नागरिकांची शेत शिवारात वर्दळ वाढली. काही दिवसांपूर्वी वाघांच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला होता. उसराळा( रिठ) सावरगाव, डोमा ,डोंगरगाव, बरडघाट, खडसंगी, हळदा ,आवळगाव, बोडधा, कुडेसावली किटाळी, बल्लारपूर, कोसंबी, वांद्रा पवनपार ,पद्मापूर ,तोरगाव, मसली, तीवरला तुकूम सायगाटा, मरार मेंढा,ढोरपा, कच्चेपार चिटकी ,नवेगाव चेक, गुंजेवाही परिसरात अशा घटना घडू नये म्हणून वन विभागाने सतर्क करून बचाव दले तैनात केली असली तरी मात्र सदर परिसरात वन्य प्राण्यांनी प्रचंड हौदोष घालत दहशत निर्माण केली आहे.

असे असताना वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यात वन विभाग सपेशल अपयशी ठरला असून जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना शेतात जावयाचे चित्र सध्या पावसाळी हंगामात निर्माण झाले आहे. लागवड खर्च जास्त असतानाही उत्पादनास मिळणारा मोबदला यातील तफावत जाणून घेतल्यास शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही.

विदर्भात शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे. प्रचंड मेहनत व महागडी बियाणांची पेरणी केल्यानंतर हाती आलेले उत्पादन याच्या विक्रीतून देशात वाढलेली महागाई व सरकारचे अन्यायकारक धोरण यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दोन वेळचे पोट भरणे अवघड होत चालले आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या च्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारचे उदासीन धोरण यास प्रमुख कारणीभूत असून विदर्भातील शेतकरी हा प्रचंड हवालदिल झालेला आहे. असे असतानाही जीवाचा धोका पत्करून शेतकरी संकटाला तोंड देत शेती व्यवसाय करीत आहे.

गेल्या आठवड्या भरतच परिसरात अशा अनेक घटना घडवून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना प्राणास मुकावे लागले. जिल्ह्यात जेव्हा जेव्हा घालण्यात नाहक बळी गेले त्यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यातील तडफदार माजी मंत्री आ.वडेट्टीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन वन प्रशासनाला धारेवर धरून त्यांची कान उघडणे केली व उपाययोजना करण्यास वारंवार सूचना देऊन आंदोलने देखील केली तसेच मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन देखील केले.

मात्र वनविभागाच्या अकार्यक्षम व निष्ठूर धोरणामुळे वाघल्ले थांबले नसल्याने व आठवडाभरातच चार जणांचा नाहक बळी गेल्याने ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, शेतकरी पुत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी वन विभागाअंतर्गत नागरिकांचे जात असलेले वन्य जीवाच्या हल्ल्यात जात असलेले बळी , परिसरातील गावांमध्ये पसरलेली वन्यजीवांची दहशत, वन प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या थोतांड उपाय योजना यावर प्रचंड संताप व्यक्त करीत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात स्थगन प्रस्तावा द्वारे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी सरकारला धारेवर धरत सभागृह दणाणून सोडले. त्यांच्या या मागणीला सभागृह अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मानव वन्यजीव संघर्षाला आळा घालण्या हेतू सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.