News34 chandrapur
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कोडशी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले तसेच जैन लेआऊट वणी येथील रहिवासी शिक्षक अजय लटारी विधाते (वय ३९) यांचा गोंडपिपरी तालुक्यातील लाठी शिवारातील नदीपात्रात रविवारी सकाळी मृतदेह आढळून आला.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या रकमेत झाली वाढ
विशेष म्हणजे, १९ जुलैपासून ते बेपत्ता होते. त्यांची दुचाकी पाटाळा पुलावर मिळाल्यानंतर तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे अंधाधुंद गोळीबार, भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू मागील तीन ते चार दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. गुरुवारी कुटुंबीयांनी वणी पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांसह एनडीआरएफने शोधमोहीम राबविली. पाटाळा नदीपात्रात त्यांचा शोध घेतला गेला.
युद्धपातळीवर शोध सुरू असतानाच रविवारी गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर गोंडपिपरी पोलिसांनी वणी पोलिसांसोबत संपर्क करून मृतदेहाची ओळख पटविली.