ग्रामपंचायत कार्यालय गावात, कारभारी जिल्ह्यावर!

गावगाड्याचा शैक्षणिक व सामाजिक विकास टांगतीवर?

एटापल्ली;(जिल्हा गडचिरोली)
तालुक्याच्या बत्तीस ग्रामपंचायतीत कार्यरत बहुतांशी ग्रामसेवक मुख्यालयापासून दीडशे किमी अंतरावतील जिल्ह्याचे ठिकाण गडचिरोली शहरात वास्तव्याने राहत असल्यामुळे ग्रामीण भागाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला खीळ बसल्याचे बोलल्या जात आहे.

पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत बत्तीस ग्रामपंचयतींमधून १९८ गावांचा सामाजिक व शैक्षणिक विकासाचा कारभार चालविला जातो, एका ग्रामपंचायत क्षेत्रात किमान पाच ते आठ गावे येतात, शासनाने ग्रामपंचायतीचे कारभारी ग्रामसेवकांवर गावात राहून गावगाड्याचा सर्वांगीण विकास साधण्याची मौलाक जबाबदारी दिली आहे. मात्र बहुतांशी ग्रामसेवक त्यांच्या पाल्यांना नामांकित शाळेत प्रवेश घेऊन दर्जरदार शिक्षण घेण्यासाठी व कुटुंबाला मूलभूत, भौतिक, सामाजिक, वैभवशाली सोयीसंपन्न वातावरणाच्या ठिकाणी राहत यावे म्हणून दीडशे किमी अंतरावरील गडचिरोली शहरात वास्तव्याने राहतात, इथे मात्र हेच ग्रामसेवक कर्तव्यात कसूर करीत असल्यामुळे ग्रामीण भागाचा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास खुंटीवर टांगला गेला आहे. असे म्हणणे वावगे ठरू नये,

ग्रामपंचायत गावात, ग्रामसेवकाची खोली तालुक्यावर आणि ग्रामसेवक राहतो जिल्ह्यावर अशा परिस्थितीत गावगाड्याची झाली आहे, त्यामुळे ग्राम स्वच्छता, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, शिक्षण व आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढतच असून शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांना विविध शासकीय लाभाच्या योजना मिळविण्यास, तसेच शालेय प्रवेश, विद्यावेतन व शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय ते तालुका स्थळावरची ग्रामसेवकाची खोली अशा चकरा माराव्या लागत आहे, पंधरा ते विस दिवस चकरा मारूनही आवशयक दाखले मिळण्याचे काम दुरापास्त झाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून, महिला, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, घरकुलाचे लाभार्थी व वयोवृद्ध नागरिकांवर शासनाच्या विविध लाभाच्या योजनांपासून वंचित राहण्याची पाळी आली असून गावगाड्याच्या खुंटलेल्या शैक्षणिक व सामाजिक विकास सुरळीत होण्यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन ग्रामसेवकांना मुख्यालयी राहून सेवा देण्याच्या सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

—————————————
—————————————
ग्रामसेवकाने ग्रामपंचायत मुख्यालया बाहेर राहणे गैर आहे, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून व सामान्य नागरिक शासकीय लाभाच्या योजनांपासून वंचित राहणे गंभीर बाब असून पंचायत समिती स्तरावरून सर्वच ग्रामसेवकांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे सक्त आदेश दिले जाणार आहेत.

आदिनाथ आंधळे
गटविकास अधिकारी पंचायत समिती,
एटापल्ली, जिल्हा गडचिरोली.