विवाहाच्या आनंदावर पडले निर्जन,
भामरागड; (जिल्हा गडचिरोली)
तालुक्यातील निसर्गरम्य बिनागुंडा धबधब्याखाली आंघोळीला उतरलेले नवनीत राजेंद्र धात्रक (वय २७) रा. चंद्रपूर हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा व त्यांना वाचविण्यास गेलेले ग्रामसेवक बादल शामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
भामरागड पंचायत समिती अंतर्गत मौजा पल्ली ग्रामपंचायमध्ये कार्यरत ग्रामसेवक बादल हेमके व त्यांचे नातलग नवनीत धात्रक हे कुटुंबासह बिनगुंडा धबधब्यावर (ता.११ जून) मंगळवारी सहलीसाठी गेले होते, नवनीत धात्रक यांचा गेल्या आठवड्यात ७ जून रोजी विवाह झाला आहे. नवविवाहित दांपत्य लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी बिनागुंडा धबडब्यावर गेली होते, मात्र काळाचा घात झाला आणि आंघोळीसाठी धबधब्याखालच्या पाण्यात उतरलेले नवनीत धात्रक खोल पाण्यात बुडायला लागले, त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ग्रामसेवक बादल हेमके यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला, मृतक धात्रक व हेमके या दोघांनाही पोहता येत नव्हते, त्यामुळे दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. यावेळी घटनास्थळावर दोघांचेही कुटुंबे उपस्थित होते, मात्र यातील कोणालाही पोहता येत नसल्याने त्या दोघांना वाचविण्यासाठी कोणीही धजावले नाहीत,
घटनेच्या माहितीवरून लाहेरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे पाठविले असून रात्री उशिरापर्यंत दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते, घटनेचा पुढील तपास लाहेरी पोलीसांकडून केला जात आहे (ता.प्रतिनिधी)