नागेपल्ली नाला घाटावर केले जाणार अंत्यसंस्कार,
अहेरी; (जिल्हा गडचिरोली)
पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोदुमतुरा येथील मुख्याध्यापक सुरेश नारायण ओडपल्लीवार (वय ४७ वर्ष) रा नागेपल्ली यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
ओडपल्लीवार हे गेले काही दिवसांपासून कावीळ या आजाराने ग्रस्त होते, (ता. २२ जून) शनिवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे प्रथम त्यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने लागलीच त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते, उपचार सुरू असतानाच (ता.२३ जून) रविवारी सकाळी सात वाजता दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली, मृत्यू पश्चात मुख्याध्यापक सुरेश ओडपल्लीवार यांना पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यविधी (२३ जून) दुपारी तीन वाजता नागेपल्ली नाला घाटावर केला जाणार आहे.