हिंसाक घटनांचे नियोजन व सुरक्षित दडुन बसण्याची खिंड ध्वस्त?
भामरागड; (गडचिरोली)
नक्षल्यांच्या दंडकारण्य प्रांत अबुजमाडच्या सीमेत समाविष्ट असलेला एकेकाळीच्या नक्षल चळवळीकडून हिंसक कारवायांचे नियोजन व नक्षल्यांना सुरक्षित दडून बसण्याची खिंड म्हणून नावलौकिक तालुक्यातील तेरा गावांच्या नागरिकांनी बंडाचे निशाण फडकवत नक्षल्यांविरुद्ध ठणठणीत, धाडसी व टोपचे पाऊण उचलून भविष्यात हिंसाचारी प्रवृत्ती खपवून घेतल्या जाणार नाहीत, नक्षल्यांनो खबरदार यापुढे तेरा गावात तुम्हाला प्रेवेश निषिद्ध आहे, असा जाहीर इशारा पोलिसांसमक्ष दिला आहे. त्यामुळे नक्षली चळवळीकडून हिंसक कारवायांचे नियोजन व हिंसाचार घडणून दडून बसण्याची खिंड ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलल्या जात आहे.
घनदाट जंगलाने व्याप्त, दऱ्याखोट्या, बारमाही वाहणाऱ्या नद्या, अविकसित, मागास, दुर्गम, आदिवासी बहुल, रस्ते विरहित व शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असा भामरागड तालुका नक्षल्यांना हिंसक कारवायांचे नियोजन व इतरत्र कारवाया घडविल्या नंतर पोलिसांपासून सुरक्षित दडून बसण्याचे ठिकाण म्हणून परिचित आहे. त्यामुळे अतिमागास भागाचा विकास साधण्याचे आवाहन शासन व प्रशासनाला होते, त्यादृष्टीने शासनाचे प्रभावी विकासात्मक योजनेचे धोरण व जिल्हा प्रशासनाने खंबीर उपयोजना राबवून गेली वीस वर्षांत शासनामार्फत नक्षल्यांना मुख्यप्रवाहात येऊन प्रगत व सामान्य जीवन जगत यावे म्हणून आत्मसमर्पण योजना राबवून शेकडो नक्षली व त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन केले, नागरिकांसाठी विविध शासकीय योजनेची माहिती पोहचून लाभ घेण्यासाठी जनजागृती, महिला, दिव्यांग, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व क्रीडा मेळाव्याचे आयोजन, पोलीस भरतीत सामील होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग, शिवणकला प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, हुशार विद्यार्थ्यांना शहरी भागातील नामांकित व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी उपलब्द करण्यात आली, त्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन प्रशासकीय सेवेत रुजू झाले आहेत, शासकीय लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाभरातील सर्वच प्रशासकीय विभागाच्या सहभागातून पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे, तसेच पोलीस स्टेशन व मदत केंद्रात पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रकल्प उडान राबवून नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
त्यामुळे लाहेरी पोलीस मदत केंद्र हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल
गावाच्या नागरिकांनी गेल्या चाळीस वर्षातील नक्षल्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवायांना कंटाळून व विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या मान्सुब्याने (ता.२४ जून) सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांची भेट घेऊन आपली कौफियात कथन केली यावेळी पोलीस मदत केंद्र लाहेरीचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार, सचिन सरकटे, आकाश पुयड धोडराज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज, पोलीस उपनिरीक्षक अमोल सुर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते, नागरिकांची व्यथा लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी ही बाब जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना कडविले त्यावरून शासन व प्रशासनाकडून नक्षली चळवळीचे उच्चाटन प्रत्येक गावात दहशतमुक्त, निर्भय वातावरणाची निर्मित करून नागरिकांना सर्वतोपरी संरक्षण दिले जाईल अशी हमी देण्यात आली आहे.
लाहेरी पोलीस मदत केंद्र हद्दीतील पाच गावांच्या परिसरात नक्षल्यांनी लपवून ठेवलेल्या पाच भरमार बंदुका हिंसक कारवाहित वापरल्या जाणाऱ्या तीनशे लोखंडी सळाखी पोलिसांपुढे सुपूर्द केल्या आहेत, यापूर्वी (१४ जून) शुक्रवारी धोडराज येथे आयोजित कृषी मेळावा प्रसंगी परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन नक्षल गावबंदीचा संमत ठराव प्रभारी पोलीस अधिकारी शरद काकळीज यांचेकडे देण्यात आला होता. त्यानंतर भटमार येथील नागरिकांनीही (ता.२०जून) गुरुवारी त्यांच्या गावात नक्षल्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती, यावेळी नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली होती, धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नेलगुंडा येथील नागरिकांनी आरडीएक्ससदृश वस्तू ठेवलेला कुकर, पाचशे लोखंडी सळाखी पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत.
त्यामुळे गेल्या पंधरवड्यात नक्षली हिंसक कारवायांना कंटाळून तेरा गावातील शेकडो नागरिकांनी नक्षल्यांना खबरदारीचा इशारा देऊन तेरा गावात प्रवेश निषिद्ध केल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे एकेकाळच्या नक्षली नियोजन व सुरक्षित दडून बसण्याचे ठिकाण ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.