भूलथापा देऊन युवतीचे लैगिक शोषण, तीन दिवसांची पोलीस कोठडी,
गडचिरोली;
येथील एका तरुणीला भूलथापा देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा व लैंगिक संबंधाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन. सव्वातीन लाख रुपयांची खंडणी मागणारा पोलीस शिपाई पद्माकर भगवान भोजने (वय 38) याचेवर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून लैगिक शोषण, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायदा आदी कलमान्वये पोलिसांत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यावरून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सराईत गुन्हेगारालाही लाजवेल असा हा गुन्हा पोलिस शिपाई पद्माकर भोजने याने केला आहे. तो विवाहित असताना देखील पत्नीला घटस्फोट दिल्याचा बहण करून त्याने २७ वर्षीय पीडित तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आपल्या जाळ्यात ओढले होते.
पोलिस शिपाई पद्माकर भोजने हा गडचिरोली पोलिस मुख्यालयात कार्यरत असून त्याने भूलथापा देऊन पीडित युवतीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केला आहे. इतकेच नाही तर, लैगिक शोषणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेकडे दीड लाखाचे दागिने आणि रोख सव्वातीन लाख रुपयाच्या खंडणीचीही मागणी केली होती, पोलीस शिपाई भोजनच्या अत्याचाराला त्रासून व आपण चौफेर फसल्या गेल्याची बाब पीडित तरुणीच्या लक्षात आल्याने तिने (ता. २३ जून) गुरुवारी आरोपी पोलीस शिपाई पद्माकर भोजने याचे विरुद्ध गडचिरोली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी भोजने यांचेवर लैगिक अत्याचार, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायदा, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलिसांकडून केला जात आहे,