नैसर्गिक आपत्ती, मृतकांच्या वारसांना बार लाखाची आर्थिक मदत,

अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते धनादेश वितरण,

एटापल्ली; (गडचिरोली)
तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू ओढवलेल्यांच्या तीन व्यक्तींच्या वारसांना शासनाने मंजूर केलेल्या प्रत्येकी चार लाख प्रमाणे बारा लाख रुपयांच्या मदत निधीचे वितरण अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीत बाधित व मृत व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावून विजांच्या कडकडाटांसह अतिवृष्टीने थैमान घातले आहे. अशातच ०२ जुलै रोजी जीवनगट्टा येथील शेतकरी चंदू पोरतेट हे शेतात काम करीत असतांना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता, तसेच ०८ जुलै रोजी मरपल्ली येथील अक्षय कुळयेटी हा तरुण मासेमारी करतांना गावशेजारच्या वाहत्या नाल्याच्या पाण्यात तोल जाऊन पडल्याने वाहून जाऊन तो मृत्यू पावला होता, तर तिसऱ्या घटनेत ०९ जुलै रोजी त्याच नाल्याच्या पाण्यात तोडसा येथील आणखी एक युवक अमित डोलू तिम्मा बुडून मृत्यू पावला होता. त्यामुळे या तिघांच्याही दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या नातेवाहिकांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने संबंधित मुतांच्या वारसांना शासकीय मदन मिळण्याची मागणी नागरिकांनी केली होती,

मागणीची दखल घेऊन तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून मंजूर निधी (ता.२२ जुलै) सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे, तहसीलदार हेमंत गांगुर्डे व गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांनी नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांच्या घरी जाऊन प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेशाचे वितरण केले आहे. प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थानांनाने पीडित, गरीब व आदिवासी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत तत्परतेने मिळवून दिल्या बद्दल प्रशासन व तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांचे सर्वत्र आभार मानतो जात आहे.

धनादेश वितरण प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कन्नाके, पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी तुलसीदास मडावी, तलाठी पी एन उसेंडी, पी डी आत्राम, कोतवाल देवाजी गावडे, सुरेश दुर्गे, सचिन गेडाम, मृतकांच्या नातेवाहिक व नागरिक उपस्थित होते.