महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ तालुका महिला काँग्रेस मैदानात,

बदलापूर, नागभीड व अन्य घटनांतील नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी,

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेविका ताराताई गावडे यांच्या नेतृत्वात येथील संविधान चौकात देश व राज्यातील विविध घटनांमध्ये चिमुरड्या बालिका व महिलांवरील अत्याचारा विरुद्ध निदर्शने करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे, यावेळी बदलापूर, नागभीड व अन्य घटनेतील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या चार वर्षीय दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेला अत्याचार तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील बसस्थानक परिसरातील सौचालयात एक वेडसर महिलेवर चार ते पाच नराधमांनी केलेला अत्याचार अशा व इतर महिला अत्याचारांच्या घटनांचा (ता. २४ ऑगस्ट) शनिवारी एटापल्ली तालुका महिला काँग्रेस, भाकपा व महिलांच्या वरीने तीव्र निषेध व्यक्त करून अत्याचारी नराधमांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी, महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा, नगरसेविका ताराताई गावडे, दिपयंती पेंदाम, कविता रावलकर, माजी सरपंच बेबी हेडो, सविता गोटा, भाग्यश्री शेंडे, जयश्री ख्रोबागडे, सविता कुर्मावार, जनाबाई दुर्गे, अनिता कुमरे, बिजली विश्वास, भारती रायसिडाम, सविता गोटा, जुबेदा शेख, बबिता गोटा, नगरसेवक निजान पेंदाम, नामदेव हिचामी, सतीश मुप्पलवार, सचिन मोतकुरवार, शरीफ शेख, विशाल पूज्जलवार, शिवाजी नरोटी, रमेश शेंडे, सुरज आलाम, अनिल पदा, संजय मट्टामी, साहिल हिचामी, राहुल गावडे, रामलू दुर्वा, लोकनाथ गावडे, सतीश मुप्पलवार, प्रज्वल नागुलवार, संपत करमरकर, राजेश सिकदर, पंकज पत्तीवार, अनिल तेलकुंटलवार, योगेश नागभिडकर, रंजीत लेकामी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.