गडचिरोली जिल्ह्यातील चार शिक्षक राज्यस्तरीय, तर तेरा शिक्षक जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराचे मानकरी!

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मान उंचावली,

गडचिरोली;
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील चार शिक्षकांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. तसेच जिल्ह्यातील बारा प्राथमिक आणि एका माध्यमिक शिक्षकास जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. (ता. ५ सप्टेंबर) गुरुवारी राज्यस्तरीय आदर्श शिक्षकांना मुंबईत, तर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकांना गडचिरोली येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक आशिष येल्लेवार, गडचिरोली येथील राणी दुर्गावती कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका संध्या शेषराव येलेकर, एटापल्ली तालुक्यातील वाळवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्रीकांत काटेलवार आणि कारवाफा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक जितेंद्र रायपुरे यांचा समावेश आहे.

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक घनश्याम हटेवार, खुर्स, ता. गडचिरोली, थलाश धाकडे शेगाव, ता. गडचिरोली, साधना भुरसे डोंगरगाव हलबी, ता. देसाईगंज, गुरुदेव मेश्राम हुऱ्यालदंड, ता. कुरखेडा, गौरव कावळे टाहकाटोला, ता. कोरची, जितेंद्र रायपुरे कारवाफा, ता. धानोरा, आशिष येल्लेवार नवेगाव रै, ता. चामोर्शी), दीपक मंडल उदयनगर, ता. मुलचेरा, वाल्मिक वनवार कसूरवाही, ता. एटापल्ली , जगन्नाथ बडगे कुमारगुडा, ता. भामरागड, रवींद्र येमसलवार रंगवणीपाठ, ता. अहेरी, श्रीनिवास असरअली ता. सिरोंचा माध्यमिक सिरोंचा येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक एन. आर. मरसकोल्हे यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह व शिक्षण क्षेत्रातून सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे.