तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध रुग्ण निदान व आजारावर उपचार,
गडचिरोली;
जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन ) एम रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतिश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, उपविभागिय पोलीस अधिकारी संदेश नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पोलीस मदत केंद्राच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी व उपचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उदघाटन जेष्ठ महिला नागरिक निलिमाताई मडावी यांनी केले, तर अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड हे होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी निंबाळकर व डॉ मेश्राम, डॉ मडावी यांनी मेळाव्यात उपस्थित शंभर ते दीडशे स्त्री, पुरुष रुग्णाच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून बोलतांना प्रभारी अधिकारी अभिजीत तुतूरवाड यांनी जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देतांना आगामी पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनाची मदत घेण्याचे आवाहन करून स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके व इतर मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी महिला, पुरुष व विद्यार्थ्यांना दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध प्रकारचे दैनंदिनी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे यांनी प्रास्तविक मार्गदर्शन करताना पोलीस विभागाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस शिपाई प्रफुल चहारे यांनी केले. मेळाव्याला राज्य राखीव पोलीस दल दौंडचे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, कस्तुरवार, जिल्हा पोलीस अंमलदार आणि राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचाऱ्यांनी मौलिक सहकार्य केले आहे. यावेळी सरपंच सुरेश जंगम, सिरीया मडावी, दासू मडावी, पोचाजी मडावी, पेंटा कुळमेथे, भारत मडावी, रामचंद्र कुमरी, रुग्ण, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती