मुलीच्या प्रेम प्रकरणातील आत्महत्येमुळे, वडील अमित यांनी हताश होऊन उचलले टोकाचे पाऊल?
मुलचेरा;(गडचिरोली)
तालुक्यातील लक्ष्मीपुर येथील एका शेत शिवारातील झोपडीच्या आड्याला एकच दोरखंड बांधून जयदेब मिलन मंडल (वय २०) रा. लक्ष्मीपूर व अमेला अमित रॉय (वय १८) रा. विजयनगर या प्रेमी युगलांनी गळफास लावून आत्महत्या केलेल्या घटनेतील युवतीचा पिता अमित अनिल रॉय (वय ४०) यांनीही गळफास लावून आत्महत्या केली आहे, या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जयदेव मिलन मंडल व अमेला अमित रॉय या प्रेमी युगलांनी एका धानाच्या शेतातील झोपडीत एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (ता. ०६) रविवारी सकाळी दरम्यान उघड झाले होते, त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी लक्ष्मीपुर व विजयनगर या दोन्ही गावात पसरली होती. माहितीवरून गावकऱ्यांनी घटनास्थळी केलेल्या गर्दीत अमेलाचे वडील अमित रॉय हेही उपस्थित होते, त्यावेळी संधी साधून त्या ठिकाणावर ते गायब झाले होते.
ही बाब नातेवाहिक व गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर अमित रॉय यांचा शोध घेण्यात आला, ते कुठेही आढळून येत नसल्याने नागरिकांना संशय आला व अमित रॉय यांच्या बेपत्ता होण्याची माहिती पोलिसांना देण्यात आली, माहितीवरून पोलिसांनी अमित रॉय यांच्या वापरातील मोबाईल ट्रेकिंग करून शोध घेण्यात आला, ट्रेकिंग लोकेशन घेतांना रात्री आठ वाजता दरम्यान अमित रॉय हे विजयनगर गाव जंगल परिसरात एक झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले, त्यांनी जंगलातील एक झाडाला नायलॉन दोरी बांधून स्वतःच्या वापरातील दुचाकी वाहनावर उभे होऊन खाली उडी घेतली, यातच त्यांच्या मानेला झटका लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही दुर्दैवी घटनेचा पंचनामा करून जयदेब मंडल, अमेला रॉय व अमित रॉय या तिघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत करण्यात आले असून, अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाहिकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.
विजयनगर येथील अमेला रॉय ही बारावीत शिक्षण घेत होती. तर, जयदेब मंडल याने बारावीनंतर शिक्षण घेणे बंद केले होते. अमेला ही (ता.०५) शनिवारी मध्यरात्री घरून बाहेर निघून जाऊन विजयनगर वरून लक्ष्मीपूर या पाच किमी अंतरावरील गावात आली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जयदेब व अमेला यांचे गळफास लावलेले मृतदेह आढळून आले होते. या दोघांनीही गळफास लावून आत्महत्या केल्याचे कारण अस्पष्ट असतांनाच अमेलाचे वडील अमित रॉय यांनी गळफास लावल्याने मुलीने प्रेम प्रकरणातुन आत्महत्या केल्यामुळे, हताश होऊन वडील अमित यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश विधाते यांचे नेतृत्वात मुलचरा पोलिसांकडून केला जात आहे.