बल्लारपुरातील कापड दुकानाला भीषण आग

बल्लारपूर शहरात अग्नितांडव

News34 chandrapur

चंद्रपूर/बल्लारपूर – वाढत्या तापमानामुळे नागरिक बेहाल झाले आहे, या तापमानाचा फटका 18 जून ला मध्यरात्री बल्लारपूर शहरातील कापड दुकानाला बसला आहे.
रात्रीच्या सुमारास बस्ती विभागातील गांधी चौकात असणारे सुरेश मालू यांच्या कापड दुकानाला भीषण आग लागली.

अल्पवयीन मुलाच्या हत्येने हादरलं चंद्रपूर, आठवडाभरात हत्येची चौथी घटना

 

आग वाढत असताना नागरिकांनी अग्निशमन दलाला याबाबत सूचना दिली, परिसरातील काही घरे खाली करण्यात आली, विशेष म्हणजे दुकानाच्या वर एक कुटुंब सुद्धा राहत होते त्यांना वेळेआधी बाहेर काढण्यात आले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे, लागलेल्या या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.