News34 chandrapur
ज्या बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना(अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई सुद्धा करण्यात येत आहे.मात्र दंड न करता नागरीकांनी स्वतःहुन रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे याकरीता मनपा प्रयत्नशील आहे. प्रोत्साहन म्हणुन घराच्या छताच्या क्षेत्रफळानुसार अनुदान व मालमत्ता करात पुढील ३ वर्षांपर्यंत २ टक्के सुट सुद्धा देण्यात येत आहे.याकरीता आवश्यक त्या कंत्राटदारांची यादी सुद्धा मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली असुन सर्वांनी आपल्या राहत्या घरी रेन वाटर हार्वेस्टिंग करण्याचे आव्हान मनपाद्वारे करण्यात येत आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे प्रकार –
१. जर तुमच्याकडे विहीर किंवा बोअरवेल असेल तर – यात जर तुमच्याकडे विहीर किंवा बोअरवेल असेल तर तुम्हाला शोषखड्डा तयार करण्याची गरज नाही.घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी हे एका जागेहून पाईपद्वारे खाली आणायचे व शुद्धीकरणाचे फिल्टर लावून पाणी स्वच्छ करून विहीर किंवा बोअरवेलमधे सोडणे. सदर फिल्टर हे आवश्यकतेनुसार स्वतः ला सुद्धा स्वच्छ करता येते.
२. जर तुमच्याकडे विहीर किंवा बोअरवेल नसेल तर – जर तुमच्याकडे विहीर किंवा बोअरवेल नसेल तरच शोषखड्डा तयार करण्याची गरज आहे. यात घराच्या आकारमानानुसार शोषखड्डा तयार करण्यात येतो. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी हे एका जागेहून पाईपद्वारे खाली आणायचे व शोषखड्यात सोडायचे.
लागणारा खर्च – रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी लागणार खर्च हा घराच्या छताच्या आकारमानानुसार तसेच फिल्टर लावून अथवा शोषखड्डा करून करावयाचे आहे त्यानुसार असतो. घराचा आकार लहान मोठा त्यानुसार खर्चातही बदल होतो.
तांत्रीक माहीती कुठे मिळेल – रेन वॉटर हार्वेस्टिंगची तांत्रीक माहीती ही कंत्राटदारांद्वारे अथवा मनपा रेन वॉटर हार्वेस्टिंग कक्ष किंवा ९०७५७५१७९०,८३२९१६९७४३ या क्रमांकावरही मिळु शकते.सदर यंत्रणा मालमत्ताधारक त्यांच्या ओळखीच्या कंत्राटदाराद्वारेही बसवु शकतात मनपाच्या कंत्राटदारांद्वारेच करणे आवश्यक नाही.
अनुदान मिळण्यास आवश्यक कागदपत्रे –
१. रेन वॉटर हार्वेस्टींगचा फॉर्म भरणे
२. आधार कार्ड
३. भरलेल्या मालमत्ता कराची पावती
४. केलेल्या कामाचे फोटो ( आधीचे व नंतरचे )
५. बँक पासबुकची प्रत