चंद्रपूर ग्रामीण कांग्रेस अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

कांग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस पक्षात अंतर्गत वाद बाहेर आले असून आगामी काळात कांग्रेस पक्षाला ही धोक्याची घंटा मानली जात आहे, महिन्याभरापूर्वी कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पक्षाने पदमुक्त केले होते, बाजार समिती निवडणुकीत भाजप सोबत युती करीत भाजप पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत देवतळे यांनी विजयी ठेका धरला त्या कारणाने महाराष्ट्र कांग्रेसने देवतळे यांना पदमुक्त करीत कारवाई केली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रकाश देवतळे
पत्रकार परिषदेत उपस्थित कांग्रेस पदाधिकारी

 

मे महिन्याच्या 29 तारखेला महाराष्ट्र कांग्रेस पक्षाने आमदार सुभाष धोटे यांना ग्रामीण कांग्रेसचा पदभार दिला, मात्र त्याच दिवशी दुसरे पत्र अखिल भारतीय कांग्रेस कमिटीने महाराष्ट्र कांग्रेसला पाठवीत देवतळे यांना पदमुक्त केल्याच्या निर्णयाला थांबविले.

 

मात्र अखिल भारतीय कांग्रेसचे ते पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले होते, याबाबत महाराष्ट्र कांग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय यांनी पत्रकार परिषद घेत प्रकाश देवतळे यांनी ते पत्र चोरले असा आरोप करीत त्यांनी पक्ष शिस्तीचा भंग केला, ते पत्र पक्ष अंतर्गत होते, देवतळे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात येणार अशी माहिती दत्तात्रय यांनी पत्रकार परिषदेत दिली.

22 जून ला स्वतः प्रकाश देवतळे यांनी पत्रकार परिषद घेत आजच्या तारखेत मीच कांग्रेस पक्षाचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहे, प्रदेश पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत माझ्यावर जे गंभीर आरोप केले त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार अशी माहिती दिली.

 

मी पक्ष विरोधी काम आजपर्यंत केल्या नाही, नेहमी पक्ष संघटन वाढविण्याचे काम केले आणि प्रदेश पदाधिकारी जर असे गंभीर आरोप करीत असेल तर ती पक्षाची व माझी बदनामी आहे, मी त्या पत्रकार परिषदेत उपस्थित कांग्रेस पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देत अब्रू नुकसानीचा दावा करणार अशी माहिती देवतळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माझी नियुक्ती ही अखिल भारतीय कांग्रेस पक्षाने केली आहे, मला जे निर्देश मिळतात त्यावर मी काम करतो, मला पदमुक्त करण्याचा अधिकार अखिल भारतीय कांग्रेस पक्षाला आहे.

एकंदरीत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरुद्ध आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात सुरू असलेला हा वाद समजल्या जात आहे.

 

खासदार धानोरकर यांच्या निधनामुळे कांग्रेस पक्षाला मोठी हानी पोहचली असून ते गेल्याने आता पदाधिकारी यांचा अंतर्गत वाद बाहेर निघत आहे, आगामी निवडणुकीत याचा मोठा परिणाम पक्षाला भोगावा लागणार हे निश्चित.