नक्षल्यांच्या क्लेमोर बॉम्ब स्फोटात दोन पोलीस जखमी,

पोलिसांची नक्षल विरोधी शोधमोहोम तीव्र,

भामरागड; (गडचिरोली)
तालुक्यातील धोडराज पोलिस स्टेशन हद्दीतील जंगल परिसरात नक्षल विरोधी शोधमोहीम राबविणाऱ्या पोलिसांना लक्ष करून नक्षल्यांनी घडवून आणलेल्या क्लेमोर माईन बॉम्ब स्फोटात दोन पोलीस जवान जखमी झाले आहेत,

प्राणहिता पोलीस मुख्यालय अहेरीच्या सी-६० पोलिसांची एक तुकडी धोडराज गाव जंगल परिसरात तीन ते चार दिवसांपासून नक्षल विरोधी शोध मोहीम राबवत होते, शोध मोहीम थांबवून (ता.०६ जुलै) शनिवारी पहाटे पाच वाजता दरम्यान पोलीस जवानांची तुकडी विश्रांतीसाठी भामरागडच्या दिशेने परत पायी चालून येत असतांना, नक्षल्यांनी पोलिसांना लक्ष करून इंद्रावती नदीवरील पुलाजवळ क्लेमोर माईन बॉम्ब स्फोट घडवून आणला, यात दोन पोलीस जवानांच्या हाताला मार लागून किरकोळ जखमा झाल्या आहेत, जखमी पोलिसांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, लागलीच दोघांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, घटनेनंतर पोलिसांकडून नक्षल विरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.