महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनाच्या वतीने सन्मान,
गडचिरोली;
जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजावंडी येथील उपक्रमशील शिक्षक मांतय्या बेडके यांचा (ता. ०५ सप्टेंबर) गुरुवारी शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची सन्मान वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे.
अतिदुर्गम, मागास, आदिवासी बहुल व नक्षलप्रभावी भागातील शिक्षणाचा स्टार उंचावून आपल्या कृत्यूशील उपक्रमाचा ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटवून राष्ट्रीय आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झाल्याने तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या वतीने त्यांच्या नागेपल्ली येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ व पिंपळाच्या झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष राजीव शेंडे, तालुका संघटनेचे अध्यक्ष दिपक नागपुरवार, कार्यवाह निलकंठ ओंडरे, श्रीनिवास पुल्लुरवार, सुधाकर वेलादी, पोई, मोगली निल्लावार, अहेरी तालुका संघटनेचे अध्यक्ष राजू आत्राम, कार्यवाह रमेश चांदेकर व शिक्षक उपस्थित होते. सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कृत शिक्षक मांतय्या बेडके यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.